लाडकी बहीण ई-KYC सोपी पद्धत!-Ladki Bahin E-KYC Made Easy!

Ladki Bahin E-KYC Made Easy!

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांना आता दोन महिन्यांच्या आत आपली ई-KYC पूर्ण करावी लागेल.

Ladki Bahin E-KYC Made Easy!

फक्त ई-KYC पूर्ण केलेल्या महिलांना या योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ई-KYC कसे करावे – Step by Step:

  1. मोबाईल, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या ब्राऊजरमध्ये www.ladakibahin.maharashtra.gov.in टाईप करा आणि Enter दाबा.

  2. मुखपृष्ठावर e-KYC बॅनरवर क्लिक करा; e-KYC फॉर्म उघडेल.

  3. फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि Captcha Code टाका, संमती देऊन Send OTP वर क्लिक करा.

  4. आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit क्लिक करा.

  5. प्रणाली तपासेल की KYC आधीच पूर्ण आहे का;

    • पूर्ण असल्यास “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश येईल.

    • नसेल, तर आधार क्रमांक पात्र यादीत आहे का हे तपासले जाईल.

  6. पात्र असल्यास पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, Captcha भरा आणि Send OTP क्लिक करा; OTP टाकून Submit करा.

  7. जात प्रवर्ग निवडा आणि खालील बाबी प्रमाणित करा:

    • कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

    • कुटुंबातील फक्त १ विवाहित व १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

  8. Checkbox टाका आणि Submit क्लिक करा.

  9. यशस्वी झाल्यावर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

महत्व: सर्व लाभार्थींनी पुढील 2 महिन्यांत ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे, ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळेल.

Comments are closed.