लाडक्या बहिणींना ई-केवायसी दिलासा!-Ladki Bahin E-KYC Extended!

Ladki Bahin E-KYC Extended!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या वेळेत अद्याप सुमारे ४५ लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली जाणार आहे.

Ladki Bahin E-KYC Extended!या योजनेत सध्या सुमारे दीड कोटी महिलांचा समावेश असून, निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर लाभार्थींची संख्या कमी झाली आहे.

योजनेचा लाभ फक्त अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाच मिळणार असल्याने ई-केवायसीद्वारे आधार लिंक करून तपासणी केली जात आहे.

पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी स्वतंत्र माहिती संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाढीव मुदतीत सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असून, अन्यथा पुढे योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

Comments are closed.