लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी पूर्ण करा! अदिती तटकरे यांचे आवाहन; १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत! | ‘Ladki Bahin’ e-KYC Deadline Extended: Complete by Nov 18!

‘Ladki Bahin’ e-KYC Deadline Extended: Complete by Nov 18!

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १८ सप्टेंबरपासून सुरू असून, १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण करावी, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे.

‘Ladki Bahin’ e-KYC Deadline Extended: Complete by Nov 18!

संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सोपी व सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मोबाईलवरूनही सोपी प्रक्रिया
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर तटकरे यांनी सांगितले की, महिलांनी ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करू शकते. आतापर्यंत हजारो महिलांनी यशस्वीरित्या ई-केवायसी पूर्ण केली असून, शिल्लक लाभार्थ्यांनीही लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.