लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी नवीच चर्चा रंगलीये. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते मिळून पुढच्या महिन्यात थेट ₹३,००० जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिना संपायला काहीच दिवस उरले असून, हप्ता कधी येणार याबद्दल महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सध्या राज्यात निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे हप्ता येणार की थांबणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. २ आणि ३ डिसेंबरला नगरपरिषद निवडणुका असल्याने हप्ता निवडणुकीपूर्वी किंवा नंतर जमा होण्याची शक्यता बोलली जात आहे. जर निवडणुकांनंतर पैसे आले, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डबल हप्ता एकत्र मिळू शकतो. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
KYC केल्याशिवाय हप्ता नाही मिळणार!
लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी KYC अनिवार्य आहे. लाभार्थी महिलांसाठी KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जेव्हा पर्यंत KYC पूर्ण होत नाही, तेव्हा पुढील १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही.
अजूनही १ कोटीहून जास्त महिलांचे KYC बाकी आहे. पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी नव्या KYC प्रक्रियेचे नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत आहे. हाच कारणास्तव KYC ची मुदत वाढवण्यात आली आहे.

Comments are closed.