लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक नवी माहिती समोर आली आहे. राज्यभर या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. अनेक महिलांचे अर्ज पात्रतेअभावी बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेची पात्रता:
- लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच लाभ मिळेल.
- आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
पडताळणी प्रक्रिया सुरू:
अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांच्या घरभेटी घेऊन पात्रतेची पडताळणी केली जात आहे. यातून अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, कारण त्यांनी निकषांबाहेर अर्ज केले होते. तसेच, ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे किंवा एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत होते, त्यांनाही आता या योजनेचा फायदा मिळणार नाही.
लवकरच खात्यात जमा होणार रक्कम:
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पात्र महिलांनी ई-केवायसी आणि पडताळणी पूर्ण करून लाभ निश्चित करावा.

Comments are closed.