लाडक्या बहिणींना मोठा फटका! ई-केवायसी न केल्याने ६७ लाख महिलांचे अर्ज बाद, ₹१५०० चा लाभ थांबणार? | 67 Lakh Women Lose Ladki Bahin Benefit!

67 Lakh Women Lose Ladki Bahin Benefit!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आधारवड ठरलेली योजना आहे. दरमहा ₹१५०० थेट खात्यात जमा होण्यामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळत होता. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

67 Lakh Women Lose Ladki Bahin Benefit!

ई-केवायसी न केल्याने लाभ थांबला
राज्य सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया सक्तीची केली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही लाखो महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही.

आकडेवारी काय सांगते?

  • एकूण २ कोटी ४७ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते
  • त्यापैकी फक्त १ कोटी ८० लाख महिलांनीच वेळेत ई-केवायसी पूर्ण केली
  • परिणामी, ६७ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले
  • ३१ डिसेंबरनंतर पोर्टलवरील ई-केवायसी सुविधा बंद करण्यात आली आहे

₹१५०० कोणाला मिळणार नाही?
ज्या महिलांनी दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, अशा महिलांना सध्या तरी दरमहा मिळणारा ₹१५०० चा लाभ मिळणार नाही, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा दुर्लक्ष यामुळे अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.

मुदतवाढ मिळणार का?
सध्या तरी ई-केवायसीसाठी कोणतीही सवलत किंवा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.

तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे वेळेत तपासा
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर संबंधित अधिकृत पोर्टलवर आपली स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यात सरकार काही निर्णय घेतं का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed.