केंद्रीय व नवोदय विद्यालयात १४,०००+ पदांची मेगा भरती – 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी! | KVS–NVS 14,000+ Posts Mega Recruitment!

KVS–NVS 14,967 Posts Mega Recruitment!

नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एकदम भारी बातमी! देशभरातल्या केंद्रीय विद्यालय (KVS) आणि नवोदय विद्यालय (NVS) याठिकाणी तब्बल १४,९६७ पदांसाठी महाभरती जाहीर झाली आहे. 10वी, 12वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी ही एक मस्त संधी आहे.

KVS–NVS 14,967 Posts Mega Recruitment!

KVS मध्ये 9,126 जागा आणि NVS मध्ये 5,841 जागा अशा एकूण 14,967 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी cbse.gov.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे.

ही भरती असिस्टंट कमिश्नर, प्रिंसिपल, PGT, TGT, लायब्रेरियन, PRT, अ‍ॅडमिन ऑफिसर, फायनान्स ऑफिसर, JSA, SSA, स्टेनोग्राफर अशा विविध पदांसाठी आहे. शैक्षणिक पात्रता 10वी/12वी, पदवी, पदव्युत्तर, B.Ed., B.Com/M.Com, BE (Civil/Electrical) इत्यादी पात्रतेनुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.

वय मर्यादा 18 ते 50 वर्षांपर्यंत, पदानुसार बदलते. वेतनश्रेणी एकदम जंगी — ₹78,800 ते ₹2,09,200!

अर्ज कसा कराल?

  • cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Newest/Recruitment लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करा व फॉर्म भरा.
  • शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  • प्रिंट काढून ठेवा.

सरकारी नोकरीची मोठी चाहूल… पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी अगदी चुकवू नये!

Comments are closed.