केंद्रीय विद्यालय प्रवेश 2026 सुरू!-KVS Admission 2026 Begins!

KVS Admission 2026 Begins!

केंद्रीय विद्यालय संघटनेने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. इयत्ता पहिली तसेच बालवाटिका (नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी) साठी 20 मार्च 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2026 आहे.

KVS Admission 2026 Begins!इयत्ता दुसरी आणि त्यापुढील वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून, रिक्त जागांनुसार 2 ते 8 एप्रिल दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. नवीन शैक्षणिक सत्र इयत्ता दुसरी व पुढील वर्गांसाठी 1 एप्रिलपासून, तर पहिली व बालवाटिका वर्गांसाठी 20 एप्रिलपासून सुरू होईल.

प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे—नर्सरीसाठी 3-4 वर्षे, ज्युनियर केजीसाठी 4-5 वर्षे, सीनियर केजीसाठी 5-6 वर्षे आणि इयत्ता पहिलीसाठी किमान 6 वर्षे वय आवश्यक आहे. ही वयोमर्यादा 31 मार्च 2026 नुसार ठरवली जाईल.

पालकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. यात जन्म दाखला, पत्त्याचा पुरावा, सर्व्हिस सर्टिफिकेट (लागू असल्यास), जात प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र तसेच EWS/BPL संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.

Comments are closed.