KVS Admission 2026: २० मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू; तारीखा, वयोमर्यादा आणि नियम जाहीर! | KVS Admission 2026: Registration starts March 20!

KVS Admission 2026: Registration starts March 20!

केंद्रीय विद्यालय संगठन ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, इयत्ता 1 आणि बालवाटिका (1 ते 3) साठी ऑनलाइन नोंदणी 20 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक पालकांना अधिकृत पोर्टलवर (admission.kvs.gov.in) जाऊन अर्ज करता येणार असून, 2 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. इयत्ता 1 साठी पहिली निवड यादी 9 एप्रिलला तर बालवाटिकेसाठी 8 एप्रिलला जाहीर होईल. उर्वरित जागांसाठी दुसरी यादी 16 एप्रिल आणि गरज असल्यास तिसरी यादी 21 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल.

KVS Admission 2026: Registration starts March 20!

प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, इयत्ता 1 साठी किमान वय 6 वर्षे असणे आवश्यक आहे. बालवाटिका-1 साठी 3 वर्षे, बालवाटिका-2 साठी 4 ते 5 वर्षे आणि बालवाटिका-3 साठी 5 ते 6 वर्षे वय असणे गरजेचे आहे. सर्व वयोमर्यादा 31 मार्च 2026 या तारखेप्रमाणे मोजल्या जातील. इतर वर्गांसाठीही ठराविक वयोमर्यादा लागू आहे.

केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण नियमांनुसार RTE अंतर्गत 25%, SC साठी 15%, ST साठी 7.5% आणि OBC (NCL) साठी 27% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इयत्ता 1 ते 8 साठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही. प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांची कमाल मर्यादा 40 निश्चित करण्यात आली आहे.

इयत्ता 2 आणि त्यापुढील वर्गांसाठी (इयत्ता 11 वगळता) प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 दरम्यान पार पडेल. अर्ज संबंधित शाळेत जमा करावा लागेल. इयत्ता 11 साठी प्रवेश प्रक्रिया CBSE च्या दहावीच्या निकालानंतर सुरू होईल.

अर्ज करताना विद्यार्थ्याचा जन्मदाखला, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), राहण्याचा दाखला आणि पालकांचा सेवा प्रमाणपत्र अशा आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असेल. देशभरात 1250 पेक्षा जास्त केंद्रीय विद्यालये असून, पालकांनी अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.