कुणबी प्रमाणपत्र वाटपाला वेग! मराठवाड्यात २.५ लाखांहून अधिकांना लाभ! | Rapid Boost in Kunbi Certificate Issuance!
Rapid Boost in Kunbi Certificate Issuance!
२ सप्टेंबरला राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करणारा निर्णय जाहीर केल्यापासून मराठवाड्यातले २८ मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झालेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलीय.

यापूर्वीच मराठवाड्यातील विविध सरकारी खात्यांमधील २ कोटी २१ लाखांहून अधिक दस्तऐवज तपासून तब्बल २,५६,५०५ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
सप्टेंबरच्या जीआरनुसार—
ज्या मराठा नागरिकांच्या कुणबी नोंदी उपलब्ध नव्हत्या, त्यांना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी त्या भागात राहिल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यासमितीतून प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला.
याच अनुषंगानं दोन सप्टेंबरनंतर ४६५ अर्ज आले, त्यात परभणी जिल्ह्यातूनच तब्बल ३५३ अर्ज होते. नांदेडमधून फक्त एकच अर्ज. त्यापैकी ५ अर्ज नाकारले, २८ मंजूर झाले आणि ४३२ अर्ज प्रलंबित आहेत.
दरम्यान,
१ ऑक्टोबर २०२३ ते २२ ऑगस्ट २०२५ या काळात २,३८,५५९ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली. दोन सप्टेंबरपूर्वी १,५१६ गावांत कुणबी नोंदी सापडल्या होत्या. ११ नोव्हेंबरपर्यंत हे प्रमाण वाढून २,५६,५०५ प्रमाणपत्रांपर्यंत पोहोचलेय, त्यात नव्याने दिलेली २८ प्रमाणपत्रेही येतात.
जिल्हानिहाय प्रमाणपत्र वितरण (मराठवाडा)
- संभाजीनगर: 20,367
- जालना: 15,334
- परभणी: 13,657
- हिंगोली: 9,571
- नांदेड: 4,461
- बीड: 1,75,796
- लातूर: 2,315
- धाराशिव: 15,004
- एकूण: 2,56,505

Comments are closed.