खेड तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत तब्बल ९ अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीस पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. या रिक्त पदांमुळे गावातील लहान मुलांचे शिक्षण आणि महिलांना मिळणारे आरोग्य व पोषण मार्गदर्शन थांबले आहे.

चाटव, निळवणे, शिरगाव-विलासनगर येथे सेविका पदे, तर म्हाळुंगे, वाडीबीड, मुरडे-मोहल्ला, नांदगाव-मोहल्ला, संगलट-बौद्धवाडी आणि तिसंगी-नवानगर येथे मदतनीस पदे रिक्त आहेत.
ग्रामस्थांनी या जागा तातडीने भराव्यात अशी मागणी केली आहे. प्रकल्प अधिकारी दीपाली शिरीषकर यांनी सांगितले की, “रिक्त पदे पुढील महिन्यात भरली जाणार आहेत. पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील.”
ही भरती पूर्ण झाल्यानंतर गावातील बालकांना पुन्हा शिक्षण, पोषण आणि आरोग्य योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.