स्टाफिंग सेवा देणाऱ्या टीमलीज (TeamLease) च्या अहवालानुसार, २०२६ मध्ये देशभरात १० ते १२ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये अंदाजे ८ ते १० लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या वाढीला विशेष महत्त्व आहे. ही नोकरी केवळ संख्यात्मक भरती नसून विविधता, समावेशकता आणि नव्या कौशल्यांवर आधारित असेल, असे एअरनस्ट अँड यंग (EY), गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, डियाजिओ आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांच्या एचआर प्रमुखांनी सांगितले आहे.

EY India कडून १५ हजारांपर्यंत भरती
EY India आपल्या आर्थिक वर्ष २०२६ (जून २०२६ अखेर) मध्ये १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. EY India च्या मुख्य मानव संसाधन अधिकारी आर्ती दुआ यांनी सांगितले की, “कॅम्पस रिक्रूटमेंट EY साठी नेहमीच महत्त्वाचा आधार राहिला आहे आणि भविष्यातही तो केंद्रस्थानी राहील.”
डियाजिओकडे नव्या कौशल्यांवर लक्ष
डियाजिओच्या भारतीय युनिटकडून डिजिटल स्किल्स, सप्लाय चेन विस्तार आणि महिला प्रतिनिधित्व वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. बदलत्या व्यवसाय गरजांनुसार नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण आणि भरती ही कंपनीची मुख्य दिशा असेल.
टाटा मोटर्समध्ये हायटेक क्षेत्रात संधी
टाटा मोटर्सकडून भरती प्रामुख्याने बॅटरी टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर-डिफाइन्ड व्हेईकल्स, हायड्रोजन इंधन, अभियांत्रिकी आणि संशोधन (R&D) या क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. कंपनीचे CHRO सीताराम कांडी यांनी सांगितले की, भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित संधी या भरती धोरणासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये समावेशकतेवर भर
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी समावेशकतेला प्राधान्य देते. सध्या ३१ टक्के असलेले महिला (cis-women), दिव्यांग आणि LGBTIQA+ समुदायाचे प्रतिनिधित्व आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
मोतीलाल ओसवालमध्ये सर्व विभागांत भरती
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसकडून टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, एआय सपोर्ट फंक्शन्स आणि सर्व व्यवसाय विभागांत नवीन तसेच रिप्लेसमेंट भरती केली जाणार आहे. CHRO निरेन श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनी महिला नेतृत्वाचे प्रमाण वाढवण्यावरही भर देत आहे.
विविधता आणि समावेशकतेकडे कॉर्पोरेट भारताचा कल
एकूणच, २०२६ मध्ये भारतीय कंपन्यांमध्ये रोजगारनिर्मिती, विविधता, समान संधी आणि भविष्यातील कौशल्यांवर आधारित भरती हा ठळक ट्रेंड पाहायला मिळणार आहे, असे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

Comments are closed.