नोकरी-इंटर्नशिप एका क्लिकवर!-Job & Internship with One Click!

Job & Internship with One Click!

विद्यापीठात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी ह्या फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक नवीन पाऊल उचललं आहे.

Job & Internship with One Click!विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ नावाचं नवीन मॉड्युल सुरु झालं आहे. ह्या पोर्टलमुळे विद्यार्थी सहजपणे नोकरी आणि इंटर्नशिप शोधू शकतील.

‘ऑन द जॉब ट्रेनिंग’, इंटर्नशिप आणि उद्योगांना उच्च शिक्षणाशी जोडण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे.

प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतात की, हे मॉड्युल फक्त नोकरी देण्याचं माध्यम नाही, तर शैक्षणिक संस्था आणि उद्योग यामध्ये मजबूत नाता निर्माण करण्याचं माध्यम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, तर उद्योगांना देशातील प्रतिभावान विद्यार्थी मिळतील, हाच मुख्य उद्देश आहे.

मुंबई विद्यापीठाने इंटर्नशिपसाठी एम्बेडेड अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच, करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (CTPC)च्या पुढाकाराने ‘प्लेसमेंट अँड ट्रेनिंग मॉड्युल’ सुरु केले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी आणि इंटर्नशिप शोधणं अगदी सोपं होणार आहे.

शासकीय, खासगी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग हि पोर्टलवर नोंदणी करून, आपल्या आवश्यकतेनुसार विद्यार्थी शोधू शकतात.

विद्यापीठाचे विविध विभाग आणि प्लेसमेंट समन्वयक यांच्यासोबत CTPC प्रभावीपणे काम करत आहे, ज्यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना उद्योगांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे.

विद्यापीठाचा हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून करिअरमध्ये सहज संक्रमण घडवून आणेल, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी नमूद केले.

Comments are closed.