सरकारी नोकरीचा शोध!-Job Hunt by Degrees!

Job Hunt by Degrees!

मध्य प्रदेशात सरकारी नोकरी मिळवायची म्हणून जवळपास २५ लाख तरुणांनी नावं नोंदवलेत. ह्यात भारी गोष्ट ही की, ह्या यादीत हजारों उच्चशिक्षित पोरं-पोरी आहेत.

Job Hunt by Degrees!सरकारी पोर्टलवर नाव नोंदवलेल्यांमध्ये ४८११ MBBS डॉक्टर, ८६ हजार इंजिनिअर, आणि १८८०० MBA पदवीधर पोरं सामील आहेत. राज्य सरकारनं त्यांना “आकांक्षित तरुण” म्हणून लिस्ट केलीये.

मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार बाला बच्चन यांनी सरकारकडं प्रश्न टाकून विचारलं होतं – सरकारी नोकरीला अर्ज करणाऱ्या तरुणांची शैक्षणिक माहिती काय? त्यावर कौशल्य विकास मंत्री गौतम टेटवाल यांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती उघड झाली.

त्यांच्यानुसार, MP रोजगार पोर्टलवर २५ लाख ६८ हजार ३२१ तरुणांनी नावं टाकलेली आहेत. त्यात ८.३ लाख पदवीधर, २.३८ लाख पदव्युत्तर आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, MBA अश्या व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांचं प्रमाण पण खूप जास्त आहे.

या अर्जदारांत १३.८१ लाख तरुण, तर ११.७६ लाख तरुणी आहेत. ओबीसी वर्गातले तरुण या यादीत सगळ्यात जास्त असल्याचंही समोर आलं आहे – जवळपास १० लाखांहून जास्त.

गौतम टेटवाल म्हणाले की, “ह्या पोर्टलवर नाव देणारा तरुण पूर्ण बेरोजगार नसतो. काही ना काही काम करतच असतो. पण त्याला अजून चांगला रोजगार हवा असतो. म्हणूनच त्यांना ‘बेरोजगार’ न म्हणता ‘आकांक्षित’ म्हणतो आम्ही.”

Comments are closed.