रोजगार संधी – लगेच नोंदणी करा!-Job Fair – Register Now!

Job Fair – Register Now!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे. या मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील बेरोजगारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

Job Fair – Register Now!सर्व खासगी आस्थापनांनी आपली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदवावी, असे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी आवाहन केले. पोर्टलवरील युझर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार दिला जाईल. अद्याप नोंदणी न केलेल्या संस्थांनी त्वरित जिल्हा कौशल्य विकास केंद्राशी संपर्क साधावा आणि मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही सांगितले गेले.

मुंबईत महारोजगार मेळावा – ८ ऑक्टोबर
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नावीन्यता विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बीकेसी (एमएमआरडीए) मैदान, जी टेक्स्ट ब्लॉक, जेएसडब्ल्यूजवळ, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ येथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी https://www.mahaswayam.gov.in पोर्टलवर नोंदणी करून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी सांगितले.

खेड खरेदी-विक्री संघाची सभा
खेड : तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता अनिकेत शॉपिंग सेंटर येथे संघाचे अध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सभेत वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके, शासकीय तपासणी अहवाल, नफावाटणी, अंदाजपत्रक मंजुरी, बाहेरील कर्ज मर्यादा व लेखापरीक्षक नियुक्ती यावर चर्चा केली जाईल. सभासदांनी उपस्थित राहावे, असे संघाचे व्यवस्थापक सचिन कुळे यांनी आवाहन केले.

Comments are closed.