सिडको प्रभाग क्रमांक २४ मधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ४ व ५ एप्रिल रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जुने सिडको येथील श्री शनि नवग्रह मंदिर परिसरात होणार आहे.
या मेळाव्यात मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, सिक्युरिटी, हॉस्पिटल, मॉल्स आदी विविध क्षेत्रांतील कंपन्या सहभागी होणार आहेत. उमेदवारांसाठी ऑन-द-स्पॉट नोंदणी आणि मुलाखतीची सुविधा उपलब्ध असेल.
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा ई-मेलद्वारे पाठवावा किंवा प्रवीण तिदमे यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावा. अधिक माहितीसाठी ९८५००८००५४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
मेळाव्यात ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सिक्युरिटी, सेल्स, ऑफिस स्टाफ तसेच इतर कौशल्याधारित नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.

Comments are closed.