जे. जे. विद्यार्थ्यांचा हक्कांसाठी लढा!-JJ Students’ Hunger Strike Begins!

JJ Students’ Hunger Strike Begins!

मुंबईतील Grant Medical College आणि Sir J. J. Group of Hospitals येथील विद्यार्थी तसेच निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णायक पाऊल उचलले आहे.

JJ Students’ Hunger Strike Begins!लोकशाही, शैक्षणिक आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडन्ट्स असोसिएशनने दिली आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जीएमसी जिमखान्याच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप, सल्लागार समितीचे प्रशासकीय समितीत रूपांतर, पीपीपी मॉडेलचा प्रस्ताव आणि निवडून आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या अधिकारांवर मर्यादा घालण्याचे प्रयत्न, हे प्रमुख आक्षेपाचे मुद्दे आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वसतिगृहांची अपुरी व असुरक्षित व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, कॅम्पस सुरक्षेतील त्रुटी, कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाचे अन्न, तसेच निवासी डॉक्टर आणि इंटर्न यांच्या मानधनात होणारा विलंब, हे तातडीचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हे बेमुदत उपोषण Mumbai येथे जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसमोरील अॅम्फीथिएटरमध्ये सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाले आहे. या आंदोलनाला मध्यवर्ती मार्ड संघटनेने पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Comments are closed.