देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘जेईई मेन’ परीक्षेच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवारी परीक्षा दिली.
या परीक्षेतील काही प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरले. विशेषतः रसायनशास्त्रातील ऑर्गॅनिक भागातील प्रश्न कठीण होते, तर गणितातील काही प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘जेईई मेन’ परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. पहिलं सत्र जानेवारीमध्ये पार पडले होते, तर दुसरं सत्र २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी शहरातून नऊ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, पहिल्याच दिवशी अनेकांना पेपर थोडा कठीण वाटल्याचे दिसून आले.

Comments are closed.