जेईई अर्जात नाव जुळले नाही!-JEE Name Mismatch Alert!

JEE Name Mismatch Alert!

जेईई मेन्स 2026 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा गोंधळ उडाला आहे. एनटीएने सूचित केले आहे की अर्ज भरताना आधार कार्डावरील नाव दहावीच्या प्रमाणपत्रावरील नावासारखेच असणे आवश्यक आहे.

JEE Name Mismatch Alert!मात्र, बहुतेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि प्रमाणपत्र यातील नाव जुळत नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही चिंतेत आहेत. या सूचनेमुळे लाखो विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

विद्यार्थ्यांना आधीच अर्ज भरण्यापूर्वी आधार कार्ड, पत्ता, फोटो आणि वडिलांचे नाव प्रमाणपत्रानुसार अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही अशीच सूचना जाहीर करण्यात आली होती, परंतु त्यावर झालेल्या आक्षेपामुळे ती रद्द करण्यात आली होती. आता तरीही एनटीएने अर्ज सुरू होण्याआधीच ही सूचना दिल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नेमकी अडचण म्हणजे, प्रत्येक बोर्डाचा गुणपत्रक नाव नोंदवण्याची पद्धत वेगळी आहे. राज्य मंडळात आडनाव, नंतर विद्यार्थ्याचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव असे क्रम असतो, तर ICSE बोर्डात नाव, आडनाव आणि आई-वडिलांचे नाव नोंदवले जाते. तर आधार कार्डात बहुतेकांनी मुलाचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा क्रम ठेवला आहे. त्यामुळे आधार कार्ड व प्रमाणपत्र यातील नावाचा क्रम जुळत नाही आणि अर्ज प्रक्रियेत त्रास होतो.

विद्यार्थी सध्या परीक्षेच्या तयारीत असताना ही सूचना अचानक लागू झाल्याने त्यांच्यावर ताण वाढला आहे. पालकांकडून एनटीएने यावर फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे, कारण प्रत्येक मंडळाची नाव नोंदण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे अनेकांना अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज भरण्याची भीती आहे.

Comments are closed.