जेईई मेन्स सत्र-२ नोंदणी सुरू!-JEE Main Session 2 Registration Open!

JEE Main Session 2 Registration Open!

देशभरातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची जेईई मेन्स २०२६ सत्र-२ परीक्षा जवळ आली असून, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही परीक्षा २ ते ९ एप्रिल दरम्यान संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने होणार आहे. अर्ज भरण्यासाठी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड आणि परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. अंतिम मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे.

सत्र-१ साठी सुमारे १३.५ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यातील ९६ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नोंदवण्यात आली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असून, स्पर्धा आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.

पहिल्या सत्रात आधार-आधारित बायोमेट्रिक व ओळख पडताळणीमुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित झाली. सत्र-२ संदर्भातील प्रवेशपत्र, शहर निवड व वेळापत्रकाची माहिती लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून तयारीस गती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments are closed.