JEE Main 2026 सत्र 2 साठीची City Intimation Slip लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. National Testing Agency (NTA) द्वारे ही स्लिप जारी केली जाणार असून, उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारे jeemain.nta.nic.in वरून ती डाउनलोड करता येईल. या सिटी स्लिपमध्ये उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख आणि शहराची माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे परीक्षेच्या नियोजनासाठी ही खूप महत्त्वाची ठरते.

JEE Main 2026 सत्र 2 परीक्षा 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र, नेमकी परीक्षा कोणत्या दिवशी आहे हे सिटी स्लिपमध्येच नमूद केलेले असेल. त्यानंतर अंतिम परीक्षा केंद्राचा पत्ता असलेले अॅडमिट कार्ड परीक्षा 3–4 दिवस आधी जारी करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सिटी स्लिप डाउनलोड करून प्रवास आणि राहण्याची तयारी आधीच करून ठेवणे गरजेचे आहे.
सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Advance City Intimation Slip – JEE Main 2026 Session 2” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर Application Number, Password आणि Security Pin टाकून लॉगिन करावे. स्लिप स्क्रीनवर दिसल्यानंतर ती डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावी.
या सिटी स्लिपमध्ये उमेदवाराचे नाव, अर्ज क्रमांक, परीक्षा शहर, परीक्षा तारीख, निवडलेला पेपर आणि इतर आवश्यक माहिती दिली जाईल. मात्र, अचूक परीक्षा केंद्राचा पत्ता यात दिला जाणार नाही, तो फक्त अॅडमिट कार्डमध्येच मिळेल. त्यामुळे सिटी स्लिप आल्यानंतर उमेदवारांनी आपले परीक्षा शहर तपासून प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Comments are closed.