देशातील प्रतिष्ठित IIT संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE Advanced 2026 परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा IIT Roorkee तर्फे आयोजित केली जाणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 6 एप्रिल 2026 पासून सुरू होणार असून 17 मे 2026 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र 11 मे ते 17 मे या कालावधीत डाउनलोड करता येणार आहे.
ही परीक्षा एका दिवसात दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी 9 ते 12, तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5:30 दरम्यान होईल. दोन्ही पेपर देणे उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.
JEE Main 2026 मध्ये पहिल्या 2.5 लाखांमध्ये स्थान मिळवणारे विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच उमेदवाराने 12 वी परीक्षा 2025 किंवा 2026 मध्ये दिलेली असणे आवश्यक आहे आणि बारावीमध्ये Physics, Chemistry आणि Mathematics हे विषय असणे बंधनकारक आहे.
ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (CBT) देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाणार असून प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.

Comments are closed.