JEE Advanced 2026 साठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयआयटी रुडकी (IIT Roorkee) यांनी JEE Advanced 2026 च्या नोंदणीच्या तारखा आणि संपूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.
ही परीक्षा देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) बी.टेक प्रवेशासाठी घेतली जाते.
याआधी जाहीर केल्याप्रमाणे, JEE Advanced 2026 परीक्षा 17 मे 2026 रोजी संगणक आधारित पद्धतीने (CBT) होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया एप्रिल 2026 पासून सुरू होईल. परदेशी नागरिक, OCI/PIO उमेदवार आणि JEE Main उत्तीर्ण भारतीय उमेदवारांसाठी नोंदणीच्या तारखा वेगवेगळ्या असतील.
JEE Main 2026 मधील अव्वल 2.5 लाख उमेदवारांनाच JEE Advanced 2026 साठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. परीक्षा एकाच दिवशी दोन अनिवार्य पेपरमध्ये होईल—पेपर 1 सकाळी तर पेपर 2 दुपारी. दोन्ही पेपर देणे बंधनकारक असून प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
परीक्षेनंतर उमेदवारांचे प्रतिसाद, तात्पुरती उत्तरतालिका, हरकती, अंतिम निकाल, तसेच आर्किटेक्चर Aptitude Test (AAT) आणि JoSAA समुपदेशनाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. IIT मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.