जेईई मेन्स २०२६ परीक्षा जानेवारी व एप्रिलमध्ये होणार आहे. अर्जनोंदणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे तयारीत ठेवण्याचे निर्देश देत आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, नवीन छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव अद्ययावत करावे. दिव्यांग आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अर्ज प्रक्रियेत कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
नोंदणीसाठी आवश्यक अधिकृत लिंक: https://jeemain.nta.nic.in
अधिक माहिती आणि सूचनांसाठी: www.nta.ac.in
हे दस्तऐवज तयारीत ठेवल्यास अर्ज प्रक्रिया सुरळीत होईल आणि विद्यार्थ्यांना वेळेवर अर्ज करण्याची संधी मिळेल.

Comments are closed.