जेईई-मेन्स २०२६ परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्यामुळे, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्वतयारीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अर्ज प्रक्रियेत अचानक अडचणी येणार नाहीत, आणि विद्यार्थ्यांची धावपळ टळेल.
विद्यार्थ्यांनी आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव काळजीपूर्वक अद्ययावत ठेवावे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड वैध आहे की नाही हे तपासावे आणि आवश्यक असल्यास त्याचे नूतनीकरण करावे. ओबीसी-एनसीएल विद्यार्थ्यांनी आपले श्रेणी प्रमाणपत्र अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून आरक्षणाचा लाभ अर्ज प्रक्रियेत अडथळा येऊ न देता मिळू शकेल.
विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तयारी करून ठेवली तर अर्ज भरण्याच्या वेळी कोणत्याही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
नोंदणीसाठी आवश्यक लिंक: https://jeemain.nta.nic.in
अधिक माहिती आणि सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळ: www.nta.ac.in

Comments are closed.