लाडकी बहीण, गॅस सबसिडी, पीएम किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांचे पैसे तुमच्या प्रधानमंत्री जन धन खात्यात येतात. जर तुमचे खाते जन धन योजनेअंतर्गत असेल, तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, १० वर्षांनंतर सर्व जुन्या बँक खात्यांसाठी री-KYC करणे बंधनकारक आहे. त्यामुळे, ३० सप्टेंबरपूर्वी तुमचे खाते री-KYC करून घ्या, अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते.
बँक खाते बंद झाल्यास काय होईल?
सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ (उदा. गॅस सबसिडी) थांबेल
आर्थिक नुकसान होऊ शकते
सरकारी योजनांचे फायदे मिळणे बंद होऊ शकते
यामुळे, वेळेत KYC अपडेट करून ही गैरसोय टाळा आणि सरकारी योजनांचा लाभ सुरू ठेवा.

Comments are closed.