जळगावात बहिणी अडचणीत! – Jalgaon Sisters in Trouble!

Jalgaon Sisters in Trouble!

जळगाव जिल्ह्यात सुमारे १ लाख ८ हजार महिलांना ई-केवायसी अपूर्ण असल्याने या महिन्यात लाभाची रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. अपात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी करण्याची घोषणा शासनाने केली होती.

Jalgaon Sisters in Trouble!मात्र, या कामासाठी मोबदला न दिल्याने अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे. परिणामी पडताळणी प्रक्रिया ठप्प झाली असून लाडक्या बहिणी आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.

जानेवारीचा लाभ न मिळाल्याने महिलांनी महिला व बालकल्याण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. लवकर पडताळणीचे आश्वासन देण्यात आले; पण बहिष्कारामुळे अंमलबजावणी रखडली आहे.

दरम्यान, महिला व बालकल्याण विभागातील अधिकारीही विविध मागण्यांसाठी आंदोलनावर असून काळ्या फिती, बैठकींवर बहिष्कार, कामबंद व सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यातही लाभ मिळण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

Comments are closed.