आयटीआर अर्ज अधिसूचित – विवरणपत्र भरण्याचा मार्ग मोकळा! | ITR Filing Now Open!

ITR Filing Now Open!

0

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी (कर निर्धारण वर्ष २०२५-२६) प्राप्तिकर विवरणपत्रांचे अर्ज बुधवारी अधिकृतपणे अधिसूचित केले आहेत. यामध्ये सर्वसामान्य करदात्यांना लागू होणारे आयटीआर-१ (सहज) आणि आयटीआर-४ (सुगम) यांचा समावेश आहे. यामुळे पगारदार व्यक्ती व लघु व्यवसायिकांसाठी विवरणपत्र भरणे अधिक सोयीचे होणार आहे.

 ITR Filing Now Open!

दीर्घकालीन नफ्यावर मिळणार सवलत!
सूचिबद्ध समभाग किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून १.२५ लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या एलटीसीजी (Long Term Capital Gain) साठी आता आयटीआर-१ आणि आयटीआर-४ स्वीकारले जातील. यापूर्वी या नफ्याबाबत करदात्यांना आयटीआर-२ भरावा लागत होता, मात्र आता हे विवरणपत्र अधिक सुलभ झाले आहे.

डिजिटल सुविधा – ड्रॉपडाऊनमधून अर्ज निवडता येणार!
करदात्यांसाठी योग्य विवरणपत्र निवडता यावे यासाठी सरकारने अर्ज युटिलिटीमध्ये ड्रॉपडाउन मेनू उपलब्ध करून दिला आहे. तसेच टीडीएस (TDS) संदर्भातील तपशील देखील आयटीआरमध्ये स्पष्ट भरावा लागणार आहे.

आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै!
ज्यांना त्यांचे खाती ऑडिट करावी लागत नाही, अशा सामान्य व्यक्तींसाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. त्यामुळे करदात्यांनी लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

फेब्रुवारीत उशीराचा कारण!
सामान्यतः आयटीआर अर्ज वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये अधिसूचित केले जातात. मात्र यंदा फेब्रुवारीत नवीन कर विधेयक संसदेत सादर झाल्यामुळे महसूल विभाग उशिरा अर्ज अधिसूचित करू शकला.

आयटीआर-१ आणि ४ कोणासाठी?
ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे अशा व्यक्तींनी आयटीआर-१ भरावे. तसेच हिंदू अविभाजित कुटुंबे व लघु व्यवसाय करणाऱ्या फर्म्स (एलएलपी वगळून) यांच्यासाठी आयटीआर-४ भरायचा आहे. यामध्ये पगार, घरमालमत्ता, इतर स्रोत व शेती उत्पन्न यांचा समावेश होतो.

परदेश प्रवास, वीज खर्चाची माहिती आवश्यक!
आयटीआर-१ मध्ये दोन लाखांपेक्षा जास्त परदेश प्रवासाचा खर्च अथवा वीज वापरावर एक लाखांपेक्षा जास्त खर्च झाला असल्यास त्याची माहिती भरावी लागेल. हे तपशील सरकारने स्पष्ट मागवले आहेत.

आयटीआर-४ मध्ये एलटीसीजीचा समावेश!
नवीन अधिसूचित आयटीआर-४ मध्ये कलम ११२अ अंतर्गत एलटीसीजीचा (१.२५ लाखांपर्यंत) अहवाल समाविष्ट केला गेला आहे. यामुळे भांडवली नफा असलेल्या व्यक्तींना सुगम मार्गाने विवरणपत्र भरता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.