ITR शेवटची तारीख आजच!-ITR Deadline Ends Today!

ITR Deadline Ends Today!

देशातल्या लाखो करदात्यांसाठी भारी गडबड चाललीये. आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज, १५ सप्टेंबर संपतीय. डेडलाइन डोक्यावर आल्यामुळे करदात्यांची धावपळ वाढली.

ITR Deadline Ends Today!पोर्टलवर तांत्रिक गोंधळ सुरू झाल्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर जोरदार आवाज उठवला – “मुदत वाढवा!” म्हणत. दरम्यान, सोशल मीडियावर मुदत वाढली की काय? अशी चर्चा जोर धरू लागली.

आयकर खात्याचं अधिकृत स्पष्टीकरण
रविवारी उशिरा रात्री आयकर खात्याने ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वर स्पष्ट केलं की, “आत्तापर्यंत कोणतीही मुदतवाढ घोषित केलेली नाही.” म्हणजेच १५ सप्टेंबर २०२५ हीच खरी शेवटची तारीख. याआधी ३१ जुलैपर्यंतची तारीख पुढे ढकलून १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

पोर्टलची खेचाखेच
शनिवार-रविवारी पोर्टल धड चाललं नाही. अनेकांनी संताप व्यक्त करत मागणी केली की – “पोर्टल काम करत नसेल तर मुदत नक्कीच वाढायला हवी.” त्यामुळे सोशल मीडियावर अफवा अधिकच पसरली.

उशिरा भरल्याचं नुकसान
जर आज ITR दाखल नाही केला, तर पुढे ३१ डिसेंबरपर्यंत बिलेटेड रिटर्न भरावं लागेल. पण त्यात नुकसान –

  • ५ लाखांखाली उत्पन्न असेल तर ₹१,००० दंड

  • ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ₹५,००० दंड

  • उशिरा कर भरल्यास व्याजही लागेल

  • आणि सर्वात मोठं – कर प्रणाली बदलता येणार नाही, तसेच मागील वर्षाचा तोटा पुढे नेता येणार नाही.

म्हणून अफवांवर न राहता, सीबीडीटीकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत आजच रिटर्न भरून घ्या. शेवटच्या क्षणी पोर्टल बंद पडलं तर आणखीच त्रास!

Comments are closed.