आयटीआयच्या दुसऱ्या प्रवेश यादीनं विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण केलंय.
महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा झपाट्यानं वाढत असलेला कल दिसतोय.
दुसरी मेरिट यादी जाहीर झाली असून, ४९ हजार ३४० विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
पहिल्या यादीत जिथं ८२ हजार ८३३ नावं होती, तिथं त्यातल्या ४२ हजार २११ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आता दुसऱ्या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झालीय.
कौशल्य शिक्षणाच्या गरजेनुसार ITI ला पसंती मिळत चाललीये, आणि दुसऱ्या फेरीतही किती विद्यार्थी प्रवेश घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
