आंतरराष्ट्रीय विकास, रोजगार धोरण आणि सामाजिक संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ITCILO कडून Paid Internship Programme जाहीर करण्यात आला आहे. ही इंटर्नशिप ट्युरिन, इटली येथे होणार असून सहभागी उमेदवारांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमात इंटर्नना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत काम करताना लेबर पॉलिसी, सोशल प्रोटेक्शन, आर्थिक विकास, डिजिटल लर्निंग, आयसीटी, मानव संसाधन आणि कामगार हक्क अशा विविध क्षेत्रांमध्ये अनुभव मिळेल. बहुसांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय वातावरणात काम करण्याची संधीही उपलब्ध आहे.
या इंटर्नशिपसाठी ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थी, अलीकडील पदवीधर तसेच कामगार आणि नियोक्ता संघटनांचे प्रतिनिधी अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख बहुतेक पदांसाठी 10 एप्रिल 2026, तर ICT (Divyang उमेदवारांसाठी) पदासाठी 10 मे 2026 आहे.
इच्छुक उमेदवारांनी ITCILO च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा.

Comments are closed.