ISRO VSSC इंटर्नशिप 2026!-ISRO VSSC Internship 2026 Open!

ISRO VSSC Internship 2026 Open!

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कौशल्यविकास आणि प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी हवी असेल, तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

ISRO VSSC Internship 2026 Open!Indian Space Research Organisation (ISRO) अंतर्गत कार्यरत असलेल्या Vikram Sarabhai Space Centre (VSSC) ने इंटर्नशिप 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ही इंटर्नशिप सायन्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र) तसेच अभियांत्रिकी (एरोस्पेस, मेकॅनिकल, CSE, ECE इ.) शाखांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. नोंदणी प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२६ आहे. इंटर्नशिपचा कालावधी १ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान (किमान २१ ते कमाल ४५ दिवस) असेल.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने BE/BTech/BSc (Physics/Chemistry) किंवा समतुल्य अभ्यासक्रमाचा किमान चौथा सेमिस्टर पूर्ण केलेला असावा आणि ६०% गुण किंवा 6.32 CGPA आवश्यक आहे. ME/MTech/MSc च्या पहिल्या सेमिस्टरमधील तसेच PhD विद्यार्थीही पात्र आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तिरुवनंतपुरम येथील VSSC येथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.

नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी vsscinternship.vssc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन लॉगिन करून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. ही इंटर्नशिप अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रतिष्ठेची संधी मानली जात आहे.

Comments are closed.