भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (NRSC) यांनी ISRO NRSC Recruitment 2025 जाहीर केली आहे. या भरतीद्वारे टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन-B आणि ड्राफ्ट्समन-B अशा मिळून 13 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 10 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.nrsc.gov.in

ISRO NRSC भरती 2025 – संक्षिप्त माहिती
- संस्था: नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC), ISRO
- पदांची नावे: Technical Assistant, Technician-B, Draughtsman-B
- एकूण पदे: 13
- जाहिरात क्रमांक: Download NRSC RMT/4/2025 Notification PDF
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्ज कालावधी: 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025
- निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा (CBT) + कौशल्य चाचणी
- पगार: 7th CPC नुसार Level-3 ते Level-7
रिक्त पदांचे तपशील:
ISRO-NRSC भरती 2025 अंतर्गत एकूण 13 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यात टेक्निकल असिस्टंट (Civil – 1 पद, Automobile – 1 पद) अशी दोन पदे आहेत. तसेच टेक्निशियन-B श्रेणीत Electronic Mechanic – 5 पदे, IT – 4 पदे, Electrical – 1 पद अशी एकूण 10 पदे आहेत. याशिवाय ड्राफ्ट्समन-B (Civil) – 1 पद उपलब्ध आहे. या एकूण 13 पदांपैकी 3 पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
अर्ज कसा करावा?
- NRSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.nrsc.gov.in
- “Recruitment / Careers” विभागातील NRSC/RMT/4/2025 लिंक उघडा
- रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा
- वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
- फोटो, सही, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- BHARATKOSH मार्फत फी भरा
- फॉर्म सबमिट करून प्रिंट सुरक्षित ठेवा
अर्ज शुल्क
ISRO NRSC भरती 2025 साठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे ठेवले आहे. Technical Assistant (Post Code 27–28) साठी उमेदवारांना ₹750 प्रोसेसिंग फी आणि ₹250 न परतणारी अर्ज फी भरावी लागते. CBT परीक्षा दिल्यानंतर वगळलेल्या गटांतील उमेदवारांना पूर्ण ₹750 रक्कम परत मिळते, तर इतर उमेदवारांना ₹500 रिफंड मिळतो. Technician-B आणि Draughtsman-B (Post Code 29–32) साठी प्रोसेसिंग फी ₹500 आणि अर्ज फी ₹100 आहे. CBT नंतर वगळलेल्या गटांतील उमेदवारांना ₹500 परत मिळते, तर इतरांना ₹400 रिफंड दिला जातो.पात्रता
वय मर्यादा (30.11.2025 पर्यंत)
- Technical Assistant: 18–35 वर्षे
- Technician-B / Draughtsman-B: 18–30 वर्षे
शिथिलता:
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- PwBD – 10 वर्षे
शैक्षणिक पात्रता
- Technical Assistant: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Civil/Automobile)
- Technician-B: SSLC/SSC + ITI/NTC/NAC (संबंधित ट्रेड)
- Draughtsman-B: SSLC/SSC + ITI/NTC/NAC (Draughtsman Civil)
पगार
- Technical Assistant – Level-7: ₹44,900 – ₹1,42,400
अंदाजे मासिक पगार: ₹70,942/- - Technician-B / Draughtsman-B – Level-3: ₹21,700 – ₹69,100
अंदाजे मासिक पगार: ₹34,286/-
शिवाय HRA, TA व इतर शासकीय सुविधा लागू.

Comments are closed.