आयपीओ घसरले, गुंतवणूकदार चिंतेत!-IPO Falls, Investors Worried!

IPO Falls, Investors Worried!

0

गेल्या वर्षीपासून शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच आहे. त्याचा मोठा परिणाम नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांवर झाला. निम्म्या कंपन्यांचे समभाग इश्यू प्राइसनंही खाली गेले. गेल्या वर्षी आयपीओंनी जोर पकडला होता, पण आता गुंतवणूकदार थोडे साशंक झालेत.

IPO Falls, Investors Worried!

२०२४-२५ आर्थिक वर्षात ७८ कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आणि त्यांनी तब्बल १.६ लाख कोटींचं भांडवल उभं केलं. पण, ७८ पैकी ३४ कंपन्यांचे समभाग आर्थिक वर्षाच्या अखेरीस इश्यू प्राइसनंही खाली गेले. काहींचे तर नोंदणीच्या दिवशीच घसरायला लागले, आणि वर्षभर उभारी घेतली नाही.

गोदावरीचा जोरदार धक्का!
गुंतवणूकदारांचं सर्वाधिक नुकसान ‘गोदावरी बायोरिफायनरीज’नं केलं. या समभागात तब्बल ५८% घसरण झाली. ‘कॅरारो इंडिया’ आणि ‘वेस्टर्न कॅरिअर्स इंडिया’ यांचे समभाग प्रत्येकी ५६% पडले. त्याशिवाय ‘टोलिन्स टायर्स’, ‘सुरक्षा डायग्नोस्टिक’, आणि ‘बझार स्टाइल रिटेल’सह अनेक शेअर्स ४० ते ५०% खाली गेले.

घसरणीतही काहींची दमदार कामगिरी!
शेअर बाजारात मोठी घसरण असली तरी काही समभागांनी जोर कायम ठेवला. ‘केआरएन हीट एक्स्चेंजर’, ‘भारती हेक्साकॉम’, ‘क्वाड्रंट फ्युचर टेक’, आणि ‘ओरिएंट टेक्नॉलॉजीज’ हे शेअर्स चांगल्या पातळीवर लिस्ट झाले आणि टिकून आहेत. तर काही शेअर्स सुरुवातीला खाली होते, पण नंतर जबरदस्त तेजी दाखवली.

अधिक किंमतीचा फटका
बाजारतज्ज्ञांच्या मते, नवीन कंपन्यांच्या शेअर्सना त्यांच्या जास्त किंमतीमुळं फटका बसला. लहान गुंतवणूकदार झटपट नफा मिळवण्याच्या उद्देशानं आयपीओमध्ये पैसे टाकतात. पण, लिस्टिंग झाल्यावर ते नफा काढून घेतात, त्यामुळे विक्री वाढते आणि शेअर्सच्या किंमती खाली येतात. याशिवाय, संस्थात्मक गुंतवणूकदारांवर असलेला ‘लॉक-इन’ कालावधी संपल्यावर मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने समभागांवर आणखी दबाव वाढतो.

बाजारात असं चढ-उतार सुरूच राहणार, त्यामुळे गुंतवणूकदारांनी योग्य अभ्यास करून निर्णय घ्यावा, असं तज्ज्ञांचं मत आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.