IOCL Apprentice 2026: गुणांवर नोकरी!-IOCL Apprentice 2026: No Exam Job!

IOCL Apprentice 2026: No Exam Job!

सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने २०२६ साठी पाईपलाइन विभागात अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. या भरतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत न घेता, उमेदवारांची निवड थेट शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.

IOCL Apprentice 2026: No Exam Job!या भरतीअंतर्गत देशभरात एकूण ३९४ अप्रेंटिस पदे भरली जाणार असून पश्चिम, पूर्व, उत्तर व दक्षिण अशा चार विभागांत प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये पश्चिम विभागात सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात (WRPL) असून अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर येथे एकूण १२ जागा आहेत. पश्चिम विभागात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान मिळून १३६ पदे उपलब्ध आहेत.

भरतीमध्ये तांत्रिक व बिगर-तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम, इन्स्ट्रुमेंटेशन) पदांसाठी संबंधित शाखेतील ३ वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी, असिस्टंट-HR साठी कोणत्याही शाखेतील पदवी, अकाउंटंटसाठी B.Com, तर डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी किमान १२वी उत्तीर्ण (पदवीधर नसणे आवश्यक) अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.

वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते २४ वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात येईल. सर्व उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण केलेली असावी.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आधी NATS किंवा NAPS पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर IOCL Pipeline च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज प्रक्रिया २८ जानेवारी २०२६ पासून सुरू होऊन १० फेब्रुवारी २०२६ (रात्री ११:५९) पर्यंत चालणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांचे प्रशिक्षण व मासिक स्टायपेंड दिले जाईल. IOCL मधील ही भरती तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात पाऊल ठेवण्याची उत्तम संधी ठरू शकते.

Comments are closed.