सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी Indian Oil Corporation Limited (IOCL) ने 2026 साठी 405 अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर केली असून, 12वी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. या भरती अंतर्गत टेक्निशियन, ट्रेड आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या विविध श्रेणींमध्ये पदे भरली जाणार असून, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फिटर, इलेक्ट्रीशियन तसेच डेटा एंट्री ऑपरेटर यांसारख्या पदांवर प्रशिक्षण दिले जाईल.

ही भरती प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये होत असून, गोवा व दादरा-नगर हवेलीतील उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाखेतील आयटीआय, डिप्लोमा किंवा किमान 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 12वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे. वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे असून, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत दिली जाईल.
या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असणार आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 मार्च 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2026 (सायं. 5 वाजेपर्यंत) आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. तसेच NATS किंवा NAPS पोर्टलवर आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे.
या अप्रेंटिसशिपद्वारे उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक कौशल्ये आणि मासिक स्टायपेंड मिळणार आहे. IOCL सारख्या मोठ्या कंपनीतील प्रशिक्षण भविष्यातील नोकरीसाठी मोठा फायदा

Comments are closed.