अपुरं अनुदान, शेतकऱ्यांची नाराजी-Insufficient Aid, Farmers Disappointed

Insufficient Aid, Farmers Disappointed

फेब्रुवारी ते मे २०२५ या दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसानं आणी गारपिटीनं शेतपिकांचं भारी नुकसान झालय. ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं ३३७ कोटी ४१ लाखांचा अनुदानाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

३४ जिल्ह्यांमधल्या जवळपास ३.९८ लाख शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ होणार. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागपूर विभागातल्या ५० हजार शेतकऱ्यांना ३५ कोटींचं अनुदान मिळणार.
अमरावती जिल्ह्यातल्या ५४ हजार शेतकऱ्यांना ६६ कोटींचा निधी मंजूर.
पुणे विभागासाठी ८१ कोटी, नाशिक विभागासाठी ८५ कोटी, तर कोकणात ९ कोटींचं वितरण होणार आहे.

मात्र, सरकारनं आता जुन्या दरानेच निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय, २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसारच वाटप होणार. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

“नुकसान वाढलंय, पण मदत तीच जुन्या दरात – हे कुठं न्याय आहे?” असा सवाल शेतकरी करत आहेत.

Comments are closed.