इन्फोसिस फ्रेशर्सना ₹21 लाख पॅकेज!-Infosys offers ₹21 LPA to freshers!

Infosys offers ₹21 LPA to freshers!

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने फ्रेशर्ससाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नुकतीच पूर्ण झालेल्या ऑफ-कॅम्पस भरती प्रक्रियेत कंपनीने तरुणांना आकर्षक पगारासोबत ₹1 लाखांचा जॉइनिंग बोनस देण्याची घोषणा केली आहे. यामुळे पगाराबाबत सुरू असलेले सर्व तर्कवितर्क संपुष्टात आले आहेत.

Infosys offers ₹21 LPA to freshers!या भरतीत केवळ नवोदितच नव्हे, तर एक वर्षापर्यंत अनुभव असलेल्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. इन्फोसिसने पात्रता आणि कौशल्यांनुसार तीन वेगवेगळ्या स्तरांवर पॅकेज निश्चित केले आहेत.
लेव्हल 3 साठी वार्षिक ₹21 लाख, लेव्हल 2 साठी ₹16 लाख, तर लेव्हल 1 साठी ₹10 लाखांचे पॅकेज देण्यात येणार आहे.

कंपनीच्या अंतर्गत माहितीनुसार, Computer Science, IT, Data Science, AI, Machine Learning, Cyber Security, Software Engineering आणि Electronics या शाखांतील BE/BTech, ME/MTech, MCA आणि M.Sc पदवीधारकांची निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आणि सुमारे 12 महिन्यांचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले आहेत.

यावेळी भरती प्रामुख्याने क्लाउड, सायबर सिक्युरिटी, डेटा इंजिनिअरिंग आणि AI या उच्च तांत्रिक भूमिकांसाठी करण्यात आली आहे. या पदांसाठी निवड झालेल्यांना 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अधिक वेतन देण्यात आले असून, फ्रेशर्सच्या वार्षिक पॅकेजमध्येही 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, इन्फोसिसच्या इतिहासात पहिल्यांदाच फ्रेशर्ससाठी इतक्या मोठ्या पॅकेजची आणि पगारवाढीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे आयटी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed.