भारतीय सैन्यात भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारी बातमी आलीये! भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयात (DG EME) आता विविध ग्रुप C नागरी पदांसाठी भरती सुरू झालीये.
या भरतीत एकूण ६९ पदं भरणार आहेत. यात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), धोबी, स्टेनोग्राफर ग्रेड-II, आणि ज्युनियर टेक्निकल क्लर्क ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर या पदांचा समावेश आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येतील. पदांचे तपशील असे —
- MTS: ३५
- LDC: २५
- धोबी: १४
- स्टेनोग्राफर ग्रेड-II: २
- ज्युनियर टेक्निकल क्लर्क: २
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी, आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे होणार आहे.
वयोमर्यादा —
- MTS, LDC, स्टेनोग्राफर आणि धोबी पदांसाठी १८ ते २५ वर्षे
- ज्युनियर टेक्निकल क्लर्कसाठी २१ ते ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता —
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेची दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in येथे जाऊन “DG EME Group C Recruitment 2025” हा पर्याय निवडावा, आवश्यक माहिती भरून फोटो, स्वाक्षरी व कागदपत्रं अपलोड करावीत आणि शेवटी प्रिंट काढावी.
भारतीय सैन्यात सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक प्रतिष्ठेची आणि सन्मानाची संधी आहे!