देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य यांनी अग्निवीर भरती २०२६ साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, देशभरातून अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत २५,००० हून अधिक पदे भरली जाणार आहेत.
या मोहिमेत अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्निकल, क्लर्क/स्टोअरकीपर टेक्निकल आणि ट्रेड्समन अशा विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आठवी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीत सहभागी होता येणार आहे. पात्र उमेदवारांना १३ मार्च २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.
शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिहाय अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ट्रेड्समनसाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असणे पुरेसे असून, क्लर्क/स्टोअरकीपर पदासाठी टायपिंग चाचणी अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीचा समावेश असणार आहे.
सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.