सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) मोठी संधी! ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, एकूण 348 पदे भरली जाणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवार 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ippbonline.com ला भेट द्यावी.
या पदासाठी उमेदवारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था किंवा बोर्डामधून कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी असणे आवश्यक आहे. पदवी नियमित किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीने घेतलेली असू शकते. 1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे. या भरतीत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही; निवड स्नातक स्तरावरील गुणांच्या टक्केवारीवरून केली जाईल.
अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ₹750 शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही आणि अर्ज मागे घेता येणार नाही. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष नीट तपासणे गरजेचे आहे आणि आवश्यक असल्यास अधिकृत संकेतस्थळावर तपशील पाहावा. ही संधी विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी महत्त्वाची आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ippbonline.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे, नंतर अर्ज फॉर्म भरून सबमिट करावा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा, जो भविष्यात संदर्भासाठी उपयोगी ठरेल.

Comments are closed.