Indian Journal for Research in Law and Management (IJRLM) ही 2023 मध्ये स्थापन झालेली, peer-reviewed जर्नल असून कायदा व व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक आणि व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. IJRLM मार्फत बहुविषयक संशोधन, नवे विचार आणि व्यावहारिक ज्ञानाच्या देवाणघेवाणीस प्रोत्साहन दिले जाते.
IJRLM कडून जानेवारी 2026 साठी Short-Term Internship Program अंतर्गत Research Intern पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या इंटर्नशिपमध्ये दिलेल्या विषयांवर संशोधन लेखन, संकलन व वेळेत सादरीकरण करणे अपेक्षित आहे. सादर होणारे संशोधन कार्य पूर्णपणे मौलिक व अप्रकाशित असणे आवश्यक आहे.
ही इंटर्नशिप सामाजिक-कायदेशीर व व्यवस्थापनाशी संबंधित समकालीन समस्यांवर संशोधन करण्याची उत्तम संधी देते. इंटर्नशिपचा कालावधी इंडक्शनपासून 14 दिवसांचा असेल.
ही पूर्णपणे ऑनलाइन (Virtual) इंटर्नशिप असून, कामाची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा संदेशांद्वारे दिली जाईल आणि काम Google Forms मार्फत सादर करावे लागेल.
कोणताही पदवी/पदव्युत्तर विद्यार्थी, PhD संशोधक, संशोधन सहकारी तसेच कायदा, व्यवस्थापन किंवा humanities क्षेत्रातील व्यावसायिक अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी 16 जानेवारी 2025 पूर्वी LinkedIn वरील दिलेल्या नोटिफिकेशनद्वारे अर्ज करावा.

Comments are closed.