IIT गांधीनगर SRIP 2026!-IIT Gandhinagar SRIP 2026!
IIT Gandhinagar SRIP 2026!
SRIP 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे संशोधन कौशल्ये व स्वतंत्र विचारक्षमता विकसित होते.
कार्यक्रमात व्याख्यानमाला, Chalk-the-Talk सत्रे, रिसर्च डायरी व प्रकल्प अहवाल लेखनाचा समावेश असून संशोधन प्रक्रियेची सखोल समज मिळते.
इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरणाद्वारे आपले काम मांडण्याची संधी मिळते, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांमधून सर्वांगीण विकासाला चालना दिली जाते. IIT गांधीनगरच्या प्रगत संशोधन सुविधा व शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
या इंटर्नशिपसाठी संबंधित शाखेतील UG व PG विद्यार्थी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून 16 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी tiny.cc/srip2026 या लिंकवरून वेळेत अर्ज करावा.

Comments are closed.