IGNOU डिसेंबर 2025 परीक्षांचे Hall Ticket जाहीर – सर्व कोर्सचे Admit Card डाउनलोड करा! | IGNOU December 2025 Hall Tickets Released!

IGNOU December 2025 Hall Tickets Released!

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) कडील डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सर्व कोर्सच्या परीक्षा जवळ आल्या असून, विद्यापीठाने सर्व परीक्षांचे Hall Ticket / Admit Card अधिकृतरित्या जाहीर केले आहेत. इग्नू हे भारतातील सर्वात मोठे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त मुक्त विद्यापीठ आहे, जे विद्यार्थ्यांना घरी बसूनही शिक्षण घेण्याची सुविधा देते. त्यामुळे भारताबरोबरच विदेशातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर इग्नूचे कोर्स पूर्ण करतात.

IGNOU December 2025 Hall Tickets Released!

IGNOU डिसेंबर 2025 परीक्षा – कधी सुरू होणार?
इग्नूच्या सूचनेनुसार डिसेंबर 2025 सत्रातील सर्व कोर्सची लेखी परीक्षा २ डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे. IGNOU वर्षात दोन वेळा परीक्षा आयोजित करते—जून सत्र आणि डिसेंबर सत्र. या डिसेंबर सत्रातील सर्व परीक्षांसाठीचे Admit Card विद्यार्थ्यांनी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

कोणत्या कोर्सचे हॉल टिकट जारी झाले?
इग्नूने खालील सर्व मुख्य कोर्सच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असून, त्यांचे हॉल टिकट जारी झाले आहेत:

  • B.A, B.Sc, B.Com
  • B.Ed
  • M.A, M.Sc, M.Com
  • M.Ed
    तसेच इतर सर्व डिप्लोमा, सर्टिफिकेट व प्रोफेशनल कोर्सेसचे Admit Card देखील उपलब्ध आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी या सर्व कोर्ससाठी इग्नूमध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांचे Hall Ticket अधिकृत वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत आणि ते सहज डाउनलोड करता येतील.

Comments are closed.