IBPS RRB लिपिक (ऑफिस असिस्टंट) प्रीलिम्स परीक्षा 2025 चा निकाल आज कधीही जाहीर होऊ शकतो, अशी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून हा निकाल अधिकृत वेबसाइट ibps.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड वापरून लॉगिन करून निकाल व स्कोअरकार्ड डाउनलोड करता येईल. या निकालामध्ये उमेदवार पुढील टप्प्यासाठी (मुख्य परीक्षा) पात्र ठरतो की नाही, हे स्पष्ट केले जाईल. निकालासोबतच कट-ऑफ गुण आणि स्कोअरकार्ड देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षा 6, 7, 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. प्रीलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाणार असून ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना पुढील काही दिवसांत अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. विशेष म्हणजे या पदासाठी मुलाखत नसून, अंतिम निवड ही केवळ मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. उमेदवारांनी ताज्या अपडेट्ससाठी ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.