IBPS RRB क्लर्क अॅडमिट कार्ड 2025: लवकरच जाहीर होणार – जाणून घ्या पूर्ण माहिती! | IBPS RRB Clerk Admit Card Soon Out!

IBPS RRB Clerk Admit Card Soon Out!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) कडून प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) ऑफिस असिस्टंट (क्लर्क) पदांसाठीच्या प्राथमिक (Prelims) परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड ibps.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

IBPS RRB Clerk Admit Card Soon Out!

हे हॉलटिकट IBPS RRB च्या 14व्या भरती प्रक्रियेअंतर्गत जारी केले जाईल. अॅडमिट कार्ड उपलब्ध झाल्यावर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून ते डाउनलोड करावे.

चयन प्रक्रिया (Selection Process)
IBPS RRB क्लर्क भरतीमध्ये निवड दोन टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा प्रिलिम्स परीक्षा असून ही फक्त पात्रता तपासणारी (Qualifying) परीक्षा असते. या टप्प्यात उत्तीर्ण उमेदवारांनाच पुढे मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा (Mains) आणि क्लर्क पदासाठी अंतिम निवड ही पूर्णपणे मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असते. या पदासाठी कोणताही इंटरव्ह्यू नसल्यामुळे मुख्य परीक्षेतील कामगिरीच यश ठरवते.

अॅडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे?
अॅडमिट कार्ड उपलब्ध झाल्यावर उमेदवारांनी सर्वप्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवरील ‘CRP RRBs’ या टॅबवर क्लिक करून “IBPS RRB Clerk Admit Card 2025” हा दुवा शोधावा. लिंक उघडल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा. स्क्रीनवर दिसणारे अॅडमिट कार्ड डाउनलोड करून त्याचा प्रिंट आउट भविष्यासाठी जतन करा.

अॅडमिट कार्डवरील तपासायच्या महत्वाच्या गोष्टी:
परीक्षेचे नाव, परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता, परीक्षा वेळ आणि तारीख, उमेदवाराचे नाव व जन्मतारीख, फोटो आणि स्वाक्षरी, परीक्षा संबंधित सूचना, विषयांची माहिती तसेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ — या सर्व तपशीलांची खात्री करून घ्या.

Comments are closed.