इंटेलिजेंस ब्यूरो (IB) ने 2025 साठी मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) MTS पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. १० वी पास केलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६२ पदे भरण्यात येणार आहेत, ज्यात अनारक्षित वर्गासाठी १६०, OBC (NCL) ७२, SC ४२, ST ५४ आणि EWS ३४ पदे राखीव आहेत.

उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असून, पगार लेवल-१ नुसार ₹१८,००० ते ₹५६,९०० पर्यंत असेल, त्यासोबत इतर भत्तेही मिळतील. निवड प्रक्रियेत टियर-I, टियर-II, इंटरव्यू/पर्सनालिटी टेस्ट, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणी यांचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mha.gov.in वर जाऊन IB MTS Recruitment 2025 लिंकवर क्लिक करावे, सर्व तपशील योग्य पद्धतीने भरावे, फोटो व सही अपलोड करावी आणि ऑनलाइन फी भरण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासावी. अर्ज फाइनल सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट आउट सुरक्षित ठेवावा.
अर्ज शुल्क: सामान्य/OBC/EWS – ₹६५०, SC/ST/सर्व महिला – ₹५५०.
ही भरती २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू असून, अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२५ आहे; शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२५ आहे.

Comments are closed.