इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालय. यंदाच्या भरती मोहिमेत एकूण 362 रिक्त पदं भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत सूचना व्यवस्थित वाचूनच अर्ज करायचा हाय.

या भरतीत उमेदवारांची निवड टियर-I आणि टियर-II या दोन लेखी परीक्षांच्या आधारे केली जाणार आहे. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
IB कडून अधिकृत पीडीएफ नोटिफिकेशन जारी झालय आणि उमेदवारांनी ते डाउनलोड करून सर्व तपशील तपासणं गरजेचं हाय. अर्ज प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत असून शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.
भरती संस्थेमध्ये इंटेलिजन्स ब्युरो (IB) असून या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास अशी आहे. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली असून नियमांनुसार सवलत लागू होईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा हाय.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आधी पीडीएफ नोटिफिकेशन डाउनलोड करावं, नंतर Apply Online वर क्लिक करून अर्ज फॉर्म नीट भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शेवटी शुल्क भरून अर्जाचा प्रिंट काढावा.
संधी मोठी हाय — तयारी करून धडाका द्या!

Comments are closed.