गुप्तचर विभागात 362 भरती!-IB MTS: 362 Govt Jobs Open!

IB MTS: 362 Govt Jobs Open!

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IB MTS भरती 2025 अंतर्गत देशभरातील 362 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, 14 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

IB MTS: 362 Govt Jobs Open!या भरतीसाठी 22 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी mha.gov.in किंवा नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवरूनच अर्ज करावा लागेल. ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर असून, SBI चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 16 डिसेंबर 2025 पर्यंतची सवलत देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा:
उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करताना संबंधित राज्याचा डोमिसाइल प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असून, SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 ते 15 वर्षांपर्यंत सूट लागू आहे.

पदसंख्या व आरक्षण:
एकूण 362 पदे ही देशातील 37 उप-गुप्तचर कार्यालयांमध्ये विभागली आहेत. केंद्र शासनाच्या नियमांनुसार SC, ST, OBC, EWS, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी आरक्षण लागू राहणार आहे.

निवड प्रक्रिया:
निवड दोन टप्प्यांत होईल. टियर-1 मध्ये सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती आणि इंग्रजी विषयांवर आधारित 100 प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा होईल. त्यानंतर टियर-2 वर्णनात्मक परीक्षा घेण्यात येईल, जी केवळ पात्रतादर्शक असेल.

पगार व भत्ते:
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-1 वेतनश्रेणी (₹18,000 ते ₹56,900) मिळेल. याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता, 20% विशेष सुरक्षा भत्ता तसेच सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अतिरिक्त मानधन देण्यात येईल.

Comments are closed.