इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने ACIO ग्रेड–II (Tech) पदांसाठी तब्बल 258 जागांची भरती जाहीर केली आहे. तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, GATE 2023, 2024 किंवा 2025 मधून पात्रता मिळवलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.
25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होणारी ही भरती प्रतिष्ठेची मानली जाते.
या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखत यांच्या आधारे केली जाणार आहे. निवड झाल्यास उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार ₹44,900 ते ₹1,42,400 इतके आकर्षक वेतन मिळणार आहे. संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन शाखेतील पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची संधी गमावू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
अधिकृत अधिसूचना, पात्रता, वयोमर्यादा, तारखा आणि अर्ज लिंक मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अधिसूचना नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.